एक्स्प्रेस गाड्यांना माजरी जंक्शनवर थांबा द्या
लोकमत न्यूज नेटवर्क माजरी रेल्वे जंक्शनवर दिल्ली-चेन्नई मार्गावर येणाऱ्या माजरी आणि जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा आणि दोन रेल्वे क्रॉसिंगवर ओव्हरब्रिज बांधण्याच्या संदर्भात माजरी रेल्वे स्थानकावर नागरिकांनी अनेकदा आंदोलन केले. १९८५ पासून दक्षिण एक्स्प्रेस किंवा सिकंदराबाद-दानापूर एक्स्प्रेस यासारख्या कमीत कमी एक किंवा दोन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली जात आहे.
यासंदर्भात...
more... अनेकवेळा तोंडी व लेखी मागण्या करण्यात आल्या. केंद्रात भाजपचे सरकार येताच माजरीवासियांची ही मागणी पूर्ण केली जाईल, असे आश्वासन भाजप पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिले आहे. मात्र, या मागणीकडे शासन व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे, ही मोठी खंत आहे. याशिवाय कोरोना संसर्ग संपल्यानंतरही माजरीमध्ये सुपरफास्ट गाड्या थांबत नाहीत. माजरीमध्ये कोळसा उद्योग असल्याने विविध प्रांतांतील नागरिक वास्तव्यास आहे. परंतु येथे राहणाऱ्या लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी माजरीत एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा नसल्याने नागपूर, चंद्रपूर आणि बल्लारशाह येथे जावे लागते. हैदराबाद निजामुद्दीन एक्स्प्रेस, सिकंदराबाद दानापूर, रायपूर एक्स्प्रेस, गोरखपूर त्रिवेंद्रम एक्स्प्रेस, अहमदाबाद- चेन्नई नवजीवन एक्स्प्रेस, जीटी एक्स्प्रेसचा माजरी रेल्वे जंक्शनवर थांबा देण्याची मागणी माजरी परिसरातील समस्त जनतेच्या वतीने भाजपचे एम. पी. राव यांनी पालकमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.