ज्यावेळेस ट्रेन मध्य रेल्वेच्या हद्दीत असते त्यावेळी वेळेचे नियोजन मध्य रेल्वे करते.
जसे रात्री १०.०० वाजता सुटणारी मुंबई-मंगलोर सुपरफास्ट एक्स्प्रेसला दादरला थांबा देणे हे मध्य रेल्वेच्या अधिकारात येते, असे कोंकण रेल्वेकडून सांगण्यात आले.
तसेच ११०८५/८६ लो.टि.ट. मडगाव डबल डेकरची वेळ ठरविण्याचा अधिकार ही मध्य रेल्वेच्या अधिकार क्षेत्रात येत असेल.
याकरिता ही डबल डेकर ट्रेन तात्पुरती दादर पश्चिम स्थानकातून मंगळवार, गुरुवार आणि...
more... शनिवारी सकाळी ६.०० नंतर चालवावी आणि मडगावहून रविवार, बुधवार आणि शुक्रवारी मांडवी एक्सप्रेस नंतर सकाळी ११.०० नंतर सोडावी आणि ह्या डबल डेकर ट्रेनला वैभववाडी, कुडाळ आणि पेडणे हे अतिरिक्त थांबे द्यावे जेणेकरून मांडवी, जनशताब्दी आणि कोंकणकन्या एक्स्प्रेसवरील अतिरिक्त ताण कमी होईल आणि चाकरमान्यांना ह्या डबल डेकर ट्रेनचा अधिकाधिक फायदा होईल.